पाकिस्तानमधील 1 हजार वर्ष जुने हिंदू मंदिर तब्बल 72 वर्षांनंतर उघडले


सियालकोट – 72 वर्षांपासून बंद असलेले पाकिस्तानातील पंजाबस्थित भागामधील सियालकोटचे 1 हजार वर्ष जुने शिवालय तेजा सिंह मंदिर पुन्हा उघडण्यात आले आहे.

हे मंदिर सरदार तेजा सिंह यांनी बांधले होते. हे मंदिर भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान बंद करण्यात आले होते. पाकिस्तानमधील काही लोकांनी भारतात बाबरी मशिद पाडल्यानंतर शिवालय तेजा सिंह मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनंतर पाक स्थित हिंदु लोकांनी मंदिरात जाणे बंद केले होते. हे मंदिर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या निर्देशानुसार पुन्हा उघडण्यात आले आहे. लवकरच मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. मंदिर उघडण्यात आले असून नागरिक मंदिराला भेट देऊ शकतात, असे सियालकोटचे उपायुक्त बिलाल हैदर म्हणाले आहेत.

428 मंदिर पाकिस्तानमध्ये असून त्यापैकी 20 मंदिर योग्यरित्या सुरू असल्याची माहिती पाकिस्तानातील हिंदू हक्क चळवळीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. बाबरी मशिद पाडल्यानंतर 1922 मध्ये 1 हजार मंदिरावर हल्ला झाला होता.

Leave a Comment