‘सेक्रेड गेम्स’च्या नव्या टीझरने वाढवली चाहत्यांची उत्कंठा


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘नेटफ्लिक्स’वरील लोकप्रिय वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’चे दुसरे पर्व येणार आहे. चाहत्यांवर या वेबसीरिजच्या पहिल्या पर्वाने कमालीची छाप पाडली होती. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने यामध्ये साकारलेले ‘गणेश गायतोंडे’ या पात्रानेही चाहत्यांवर राज्य केले आहे. ‘गणेश गायतोंडे’ची नवी झलक आता पुन्हा एकदा सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या पर्वात पाहायला मिळणार आहे. नुकताच हिच झलक असलेला दुसरा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या पर्वासाठी बऱ्याच दिवसापासून चाहते आतुर झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. नवाजुद्दीनच्या तोंडी आता नव्या टीझरमध्ये असलेले ‘भगवान को मानते हो, पर कभी सोचा है की भगवान किसको मानता है, हा संवाद प्रेक्षकांचे लक्ष वेधुन घेत आहे.

गणेश गायतोंडे, बंटी, ‘दिलबाग सिंग’, ‘सरताज सिंग’ यांच्या भोवती ‘सेक्रेड गेम्स’ची कथा गुंफली गेली आहे. पहिल्या पर्वात धक्कादायक वळणावर समारोप घेणारी ही सीरिज आता नवे ट्विस्ट घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज बऱ्याच कारणामुळे गाजली होती. ‘सेक्रेड गेम्स’च्या आता दुसऱ्या पर्वात कोणते वळण पाहायला मिळते हे पाहणे रंजक ठरेल.

१५ ऑगस्ट रोजी ‘सेक्रेड गेम्स’ ही सीरिज रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचे दोन बिग बजेट चित्रपट याच दिवशी रिलीज होणार आहेत. अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ आणि जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हे दोन्हीही चित्रपट याच दिवशी रिलीज होणार आहे. आता त्यामध्ये ‘सेक्रेड गेम्स २’ चीही भर पडली आहे.