तापसी-भूमीच्या ‘सांड की आँख’चा टीझर रिलीज


अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू यांच्या आगामी ‘सांड की आँख’ चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या दोन्ही अभिनेत्रींचा शूटर दादीच्या भूमिकेत अनोखा अंदाज रूपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. उत्तर प्रदेश मधील गावातील वृद्ध शार्पशूटर प्रकाशी तोमर आणि चंद्रो तोमर यांच्या खऱ्या आयुष्यावर ‘सांड की आँख’ चित्रपटाची कथा आधारलेली आहे.

तुषार हिरानंदानी यांनी ‘सांड की आँख’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दिवाळीच्या मूहुर्तावर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. भूमी आणि तापसी शूटर बणण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत, हे टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. या दोघांनी अनेक समस्यांना सामोरे जात कशा प्रकारे ३५२ मेडलवर आपले नाव कोरले, हे देखील चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे चित्रपटाच्या माध्यमातून त्यांचा प्रवास इत्यादी गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच जोर धरत आहे. आता तापसी आणि भूमीचा ‘सांड की आँख’ चित्रपट चाहत्यांचे किती मनोरंजन करेल हे पाहाणे मजेशीर ठरणार आहे.

Leave a Comment