विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरही करोडपती झाली टीम इंडिया!


मॅंचेस्टर : भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न स्पर्धेतील उपांत्य फेरीत न्यूझीलंडने पराभूत केल्यामुळे भंगले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या भारतीय संघाची जोरदार चर्चा होत आहे.पण, उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतरही टीम इंडिया करोडपती झाली आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर 14 जुलै रोजी विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. भारताला या सामन्यात ट्रॉफी आणि 5.5 कोटी देण्यात येणार आहे. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या तरी संघांना जास्त किमतीचे बक्षिस देण्यात येणार आहे.

न्यूझीलंडने काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला 18 धांवांनी पराभूत केल्यामुळे भारताचे अंतिम सामन्यात खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. असे असले तरी, यंदाच्या विश्वचषकामध्ये आयसीसीच्या वतीने बक्षिसाची रक्कम वाढवण्यात आली आहे. विश्वचषक 2019मध्ये विजेत्या संघाला 28 कोटी, एक ट्रॉफी आणि क्रिकेटपटूंना बॅज देण्यात येणार आहेत. तर, विश्वचषकमध्ये उपविजेत्या संघाला 14 कोटी रुपये बक्षिस स्वरूपात देण्यात येणार आहेत. तसेच, सेमीफायनल खेळणाऱ्या संघांना प्रत्येकी 5.50 कोटी देण्यात येणार आहेत. विजेत्या संघाला मिळणारी ट्रॉफी 11 किलोग्राम वजनाची आहे. सोने आणि चांदी यांच्यापासून ही बनवण्यात येते. मात्र. मात्र आयसीसी खरी ट्रॉफी आपल्याकडे ठेवते तर, एक दुसरी ट्रॉफी विजेत्या संघाला देते.

Leave a Comment