देशद्रोही मीडियासाठी माझ्याकडे जराही सहनशीलता नाही – कंगना राणावत


जजमेंटल है क्या या आगामी चित्रपटाचे गाणे रिलीज करते वेळी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट आणि पत्रकार संघातील वाद अद्यापही थांबला नाही, उलट वेळेनुसार हा वाद आणखीच वाढत चालला आहे. एवढा हा वाद वाढला आहे की, कंगनाला तिच्या चुकीच्या वर्तनामुळे एंटरटेनमेंट गिल्ड ऑफ इंडियाने बॅन केले आहे, ज्याबद्दल अशातच कंगनाने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कंगनाने या व्हिडीओमध्ये भारतीय मीडियाबद्दल बोलताना काही पत्रकारांना देशद्रोही, दोन्ही बाजूंनी बोलणारे आणि काही पैशांमध्ये विकले जाणारे असे संबोधले. कंगनाने आपल्या व्हिडिओमध्ये याव्यतिरिक्त कोणत्याही पत्रकाराचे नाव न घेता काही आरोपही केले आहेत. या व्हिडिओमध्ये कंगनाने आधी मीडियातील काही लोकांनी प्रोत्साहित केल्याबद्दल त्यांना धन्यवाद म्हणले. पण यानंतर कंगनाने एका मीडिया समूहाविषयी म्हटले की, देशाच्या आत्मसन्मानाला हा भाग ढेकूणसारखा घाव घालणारा आहे. ती पुढे म्हणाली, देशासाठी ही मीडिया घाणेरडे, बीभत्स विचार पसरवत आहे, सोबतच देशद्रोहाला प्रोत्साहन देऊन देशाच्या एकतेवर प्रहार करत आहे.

View this post on Instagram

would like your attention. This is important. Listen up!

A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on


कंगनाने व्हिडिओमध्ये सांगितले की, एका पत्रकाराला माझ्या कामाची, इव्हेंटची आणि चित्रपटांची खिल्ली उडवताना पहिले होते. कोणताही तर्क-वितर्क किंवा विचार यांच्याकडे नाहीत, हे तर केवळ फुकटचे जेवण करण्यासाठी प्रेस कॉन्फ्रेंसला येतात. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओमध्ये कंगनाने त्यांना नालायक आणि 50 रुपयांत विकले जाणारे पत्रकारदेखील म्हटले आहे. कंगनाने आपल्या व्हिडिओमध्ये मीडियाला स्वतःला बॅन करण्याबद्दल सांगितले आणि म्हणाली की, ‘माझी इच्छा नाही की, माझ्यामुळे तुमच्या घरात चूल पेटावी, त्यामुळे मला बॅन करा…’ असे म्हटले आहे.

Leave a Comment