नागपूर विद्यापीठात शिकविला जाणार संघाचा इतिहास


नागपूर : एक वादग्रस्त निर्णय नागपूर विद्यापीठाने घेतला असून नुकताच संघाच्या इतिहासाचा विद्यापीठाने अभ्यासक्रमात समावेश केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात शिकवला जाणार आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या इतिहासाचा समावेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. 1885 ते 1974 या कालखंडात भारताचा इतिहास या भागाचा विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात देखील समावेश आहे. विद्यार्थ्यांना या भाग शिकवताना संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देखील शिकवले जाणार आहे. संघाचा इतिहास पहिल्यांदाच महाराष्ट्रातील विद्यापीठात शिकवला जाणार असल्याने या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Leave a Comment