इस्रोने प्रसिद्ध केले चांद्रयानाचे फोटो


भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या चांद्रयान -2 च्या लाँचिंगची तयारी पूर्ण झाली असून हे लाँचिंग 15 जुलैला होणार आहे. त्यातच आता इस्रोच्या वेबसाइटवर चांद्रयान -2 चे हे काही फोटो प्रसिद्ध झालेले आहेत. तब्बल एक हजार कोटी रुपयांचा चांद्रयान -2 मोहिमेसाठी खर्च आला आहे.

चांद्रयान -2 हे यान प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार असून या पूर्ण अवकाशयानाचे वजन 8 हतींच्या वजन इतकेच म्हणजे 3.8 टन एवढे आहे. जेव्हा चंद्राच्या बाहेरच्या कक्षेत चांद्रयान -2 पोहोचेल तेव्हा त्यामधील विक्रम हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. अशा प्रकारे चंद्रावर इस्रो पहिल्यांदाच यान उतरवणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान उतरेल.

13 उपग्रहही चांद्रयान -2 मध्ये असतील. एकूण सगळे वजन 3.8टन एवढे असणार आहे. ‘नासा’ ने याआधी 1969 मध्ये अपोलो यान चंद्रावर पाठवले होते. 2 हजार 620 कोटींचा खर्च त्यासाठी आला होता. इस्रोच्या या मोहिमेसाठी त्या तुलनेत कमी म्हणजे 1 हजार कोटींचा खर्च आला आहे.

Leave a Comment