झायरा वसिमने धुडकावली बिग बॉसची १.२ कोटींची ऑफर?


अभिनेत्री झायरा वसिमने ‘दंगल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण झायराने काही दिवसापूर्वीच बॉलिवूडमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. ती तिच्या या निर्णयानंतर माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरली. त्यातच आता छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉसच्या १३ व्या पर्वामध्ये ती झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण या चर्चांना पूर्णविराम देत झायराने आपण या शोमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. तिला या शोसाठी १.२ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. परंतु तिने ही ऑफरही धुडकावून लावली.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉसच्या १३ साठी झायराला विचारणा करण्यात आली होती. तिला या शोमध्ये सहभागी होण्यासाठी १.२ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पण झायराने ही ऑफर नाकारली आहे. तिने घेतलेल्या निर्णयामुळे ती बॉलीवूडमधुन हळूहळू काढता पाय घेत असल्याचे पुन्हा एकदा जाणवत आहे.


दरम्यान, बिग बॉस हा शोसाठी झायराकडे विचारणा केली होती. पण तिने ही ऑफर नाकारली आहे. बॉलिवूडला रामराम करण्याचा निर्णय घेणाऱ्या झायराचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट झायराच्या कारकिर्दीमधील अखेरचा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment