राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधीनी घेतला चित्रपट पाहण्याचा आनंद


सध्या सोशल मीडियावर राहुल गांधींचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. बुधवारी दिल्लीतील हा राहुल यांचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर ख्यातनाम फोटोग्राफर विराल भयानी यांनी शेअर केला आहे. बुधवारी दिल्लीतील पीव्हीआर सिनेमा हॉलमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी पोहोचले. त्यांनी येथे सध्या चर्चेत असलेला ‘आर्टिकल 15’ हा चित्रपट पाहिला. थिएटरमध्ये राहुल यांना पाहून प्रेक्षक चकित झाले असल्यास नवल नाही.


अलिकडेच काँग्रेस अध्यक्ष पदाचा राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. मुंबईत काल ते न्यायालयाच्या कामासाठी आले होते. सामाजिक स्तरावर ‘आर्टिकल 15’ हा चित्रपट भरपूर चर्चेत आहे. अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट बराच गाजतो आहे. आयुष्यमान खुराणाची यात प्रमुख भूमिका आहे. आयुष्यमान यांच्याशिवाय या चित्रपटात अलावा ईशा तलवार, एम नसर, मनोज पाहवा, सयानी गुप्ता, कुमुद मिश्रा आणि मोहम्मद जीशान अय्यूब यांच्या भूमिका आहेत. या सर्वांच्या जबरदस्त परफॉर्मन्सचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Comment