न्युयॉर्कमध्ये ऋषी कपूर यांच्या भेटीला अर्जुन-मलायका


सध्या न्युयॉर्कमध्ये बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे उपचार घेत आहेत. बऱ्यापैकी त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली आहे. आत्तापर्यंत त्यांची कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी भेट घेतली. सोशल मीडियावर नीतू कपूर या त्यांचे काही फोटोदेखील शेअर करत असतात. त्यातच आता ऋषी कपूर यांची मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनीदेखील भेट घेतली. नीतू कपूर यांनी त्यांचा फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.


मलायका आणि अर्जुनने काही दिवसांपूर्वीच आपल्या नात्याची अप्रत्यक्षरित्या कबुली दिली आहे. ते दोघे सोबत न्युयॉर्कमध्येही फिरायला गेले होते. तिथेच त्यांनी ऋषी कपूर यांची भेट घेतली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये अर्जुन आणि मलायकाचा हात ऋषी कपूर यांनी पकडलेला दिसत आहे. तर, नीतू कपूरदेखील त्यांच्या शेजारी बसलेल्या दिसत आहेत.

अर्जुनच्या वाढदिवशी मलायकाने शेअर केलेल्या एका फोटोमुळे त्या दोघांच्या नात्याची आणखी चर्चा पाहायला मिळाली. मलायकाने अलिकडेच एका मुलाखतीत तिला अर्जुन कपूर आवडत असल्याची कबुली दिली होती. तसेच, तिच्या मुलाला त्यांच्या नात्याबद्दल काही अडचण नसल्याचेही तिने सांगितले होते.

Leave a Comment