
‘दम लगाके हैश्या’, ‘शुभमंगल सावधान’, ‘टॉयलेट-एक प्रेमकथा’ यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची झलक दाखवणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर आता लवकरच विकी कौशलसोबत ‘भूत’ चित्रपटात झळकणार आहे. पण या चित्रपटात तिचा कॅमिओ असणार आहे.
करण जोहरच्या ‘भूत’मध्ये भूमीचा कॅमिओ
बऱ्याच चित्रपटात यावर्षी भूमी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘सोनचिरीयां’ चित्रपटात तिने सुशांत सिंग राजपूतसोबत भुमिका साकारली होती. या चित्रपटानंतर ती ‘डॉली किट्टी और चमकते सितारे’, अमर कौशिक यांचा ‘बाला’ आणि तुषार हिरानंदानीच्या ‘सांड की आँख’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
करण जोहर आणि शशांक खेतान यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आगामी हॉरर ‘भूत’ या चित्रपटाची घोषणा केली होती. विकी कौशल हा यामध्ये थरारक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. भूमीचा या चित्रपटात रोल कॉमिओ असल्यामुळे अवघ्या ७ मिनीटांची तिची भूमिका असणार आहे. भूमीची कमी भूमिका असल्याने ती चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशनमध्ये सहभागी राहणार नाही.
