हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’चे नवे गाणे तुमच्या भेटीला


हृतिक रोशनच्या आगामी ‘सुपर ३०’ या चित्रपटाची प्रतिक्षा आता अवघ्या काही दिवसात संपणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि एक गाणे आत्तापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. चित्रपटाबद्दलची उत्सुकता ट्रेलर पाहून चाहत्यांची वाढली आहे. नुकतेच या चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. बेरंग जगाचे रंगलेले वास्तव या गाण्यातून पाहायला मिळत आहे.

हे गाणे पैशांच्या व्यवहारावर आधारित असून हे गाणे विशाल ददलानी आणि अजय-अतुल यांनी मिळून कपोज केले आहे. तर, या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. या गाण्याला सोशल मीडियावर चाहत्यांचा चागंला प्रतिसाद मिळत आहे. हृतिकनेही एक पोस्ट शेअर करुन चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आभार मानले आहेत.

आधी चित्रपटातील ‘जुगराफिया’ हे गाणे रिलीज करण्यात आले होते. मृणाल ठाकुर आणि हृतिकची केमेस्ट्री या गाण्यात पाहायला मिळाली. हे गाणे श्रेया घोषाल आणि उदित नारायण यांनी गायले होते. १२ जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे.

Leave a Comment