अभिजीत बिचुकलेला बिग बॉसच्या घरातून अटक


सातारा – बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व गाजवणाऱ्या अभिजित बिचुकले याला साताऱ्यातील चेक बाऊन्सप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गोरेगावच्या आरे पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांनी बिचुकलेला बिग बॉसच्या घरातून अटक केली.

सध्या बिचुकले आरे पोलिसांच्या ताब्यात असून बिचुकलेला घरातून बाहेर काढण्याची मागणी दोन दिवसांपूर्वी महिला संघटनांनी केली होती. न्यायमूर्ती आवटी यांच्याकडे बिचुकले याच्याविरोधातील एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणाचा खटला सुरू होता. याप्रकरणी बिचुकलेला अटक करण्याचे आदेश आवटी यांनी दिल्यानंतर एलसिबीने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, बिचुकलेची शोमधून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी केली होती. त्यानंतर लगेचच पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे यामागे नक्की काय घडले याची चर्चा सूरु आहे. त्याच्या अटकेनंतर आता त्याचा बिग बॉसमधील प्रवास येथेच संपणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Comment