
नवी दिल्ली – जगभरात सध्याच्या घडीला क्रिकेट महाकुंभ असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची जोरदार चर्चा सुरु असतानाच इंग्लंडमध्ये सुरु असलेली काऊंटी क्रिकेट स्पर्धेची जोरदार चर्चा सुरु आहे. या स्पर्धेमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर एका फलंदाजाला क्लीन बोल्ड केल्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता याच स्पर्धेतील एका सामन्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे.
असा झेल तुम्ही कधीच पाहिला नसेल
This is incredible work! pic.twitter.com/i6SZ2i8dGk
— County Championship (@CountyChamp) June 17, 2019
या सामन्यात फिरकीपटूने चेंडू टाकला. तो चेंडू फलंदाजाला कळायच्या आत यष्टिरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये तो गेला. पण, तो यष्टिरक्षकालाही पकडता आला नाही. तरी देखील चेंडू जमिनीला स्पर्श करायच्या आतच यष्टिरक्षकाने त्या चेंडूला अत्यंत चालाखीने पायाने उडवले आणि सिली पॉईंटला उभ्या असलेल्या खेळाडूने क्षणाचाही विलंब न लावता तो झेल टिपला. तो फलंदाजही हा प्रकार पाहून काही काळ आश्चर्यचकित झाला होता. क्रिकेटच्या इतिहासात याआधी अनेक भन्नाट झेल घेतलेले आहेत. आता या झेलचाही समावेश त्यात झाला आहे.
