आंतरराष्ट्रीय सामन्यात अवघ्या ६ धावात बाद पूर्ण संघ


नवी दिल्ली – एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद आयसीसीच्या क्विबुका महिला स्पर्धेत खेळण्यात आलेल्या रवांडा आणि माली देशांमध्ये खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात झाली आहे. माली महिला संघावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अवघ्या ६ धावांमध्ये ऑलआउट होण्याची नामुष्की ओढवली. ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात निचांकी धावसंख्या ठरली आहे.

या ६ धावांमध्ये ५ धावा या अवांतर होत्या. माली संघातील फक्त एका महिला खेळाडूला आपले खाते उघडता आले. सलामीला आलेली बैटर मरियम समाकेने ही १ धाव घेतली. यानंतर आलेल्या एकाही फलंदाजाला खाते खोलता आलेले नाही. मालीने दिलेले हे आव्हान रवांडाच्या महिला संघाने अवघ्या ४ चेंडूत पार केले.

Leave a Comment