
जयपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मैं भी चौकीदार’ या मोहिमेची देशात मोठी चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या मोहिमेचाच एक भाग म्हणून आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या नावासमोर ‘चौकीदार’ असा शब्द जोडल्याचे पाहायला मिळत आहे.
आयपीएलच्या सामन्यात ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा
Crowd at IPL match yesterday saying "Chowkidar Chor Hai" 😲pic.twitter.com/er8pgOQJgC
— Zainab Sikander (@zainabsikander) March 26, 2019
त्यानंतर देशात चौकीदार या शब्दावरुन सुरु झालेले महाभारत आयपीएलमधील बाराव्या हंगामातील किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यातही पहायला मिळाले. चौकीदार चोर है ! च्या घोषणा सवाई मानसिंह मैदानावर झालेल्या या सामन्यात देण्यात आल्या. या घोषणाबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
जयदेव उनाडकटने सामन्याच्या १८व्या षटकातील पहिला चेंडू टाकला तेव्हा नॉर्थ स्टँडमधून मोदी-मोदी, अशा घोषणा सुरु झाल्या. या षटकामध्ये निकोलस पूरनने जेव्हा चौकार लगावला तेव्हा चौकीदार चोर है ही घोषणा देण्यात आली. उनाडकट तिसरा चेंडू टाकेपर्यंत स्टेडियमधील चाहत्यांनी तब्बल पाच वेळा ‘चौकीदार चोर हैं’चा नारा दिला.
