मायकल फेल्प्सला देखील आवरता आला नाही आयपीएल पाहण्याचा मोह

Michael-Phelps
नवी दिल्ली – मंगळवारी दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर चेन्नई आणि दिल्ली यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी अमेरिकेचा अव्वल जलतरणपटू मायकल फेल्प्स याने हजेरी लावली होता. एका प्रचार कार्यक्रमासंबंधी दिल्ली येथे ऑलिम्पिंकमध्ये २३ सुवर्णपदक विजेता फेल्प्स आला आहे. त्याचा संध्याकाळचा वेळ त्याने क्रिकेट पाहण्यासाठी दिला आणि आयपीएलच्या सामन्याचा मनमुराद आनंद घेतला.


यासंदर्भात माहिती देताना बीसीसीआयचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले, की यापूर्वी कधीच जलतरणपटू मायकेल फेल्प्सने क्रिकेट पाहिले नाही. तो स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स संघाचा पाहुणा बनून उपस्थित होता. त्याला भारतातील सर्वात लोकप्रिय लीग पाहण्याची संधी मिळाली.


पहिल्यांदाच अमेरिकेचा हा ३३ वर्षीय जलतरणपटू भारत दौऱ्यावर आला आहे. त्याने सामना पाहण्यासाठी काही वेळ दिल्यानंतर तो स्टेडियम सोडून निघून गेला.

Leave a Comment