लंडन पोलिसांनी आवळल्या कर्जबुडव्या नीरव मोदीच्या मुसक्या

nirav-modi
लंडन – पीएनबी बँकतील गैरव्यवहाराला जबाबदार असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे. लंडन येथील न्यायालयात त्याला हजर केले जाणार आहे. लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने भारतात घोटाळा करुन फरार झालेल्या या उद्योगपतीविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. आता भारतात प्रत्यार्पण करण्याच्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात केली जाणार आहे. याचदरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीरव मोदीची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाकडून विकली जाऊ शकते.

भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाकडून प्रत्यार्पण अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट लागू केले होते. त्यानंतर नीरव मोदीला कधीही अटक केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले होते. सध्या लंडनमध्ये नीरव मोदी ऐषोरामी जीवन जगत होता. लंडनमधील वेस्ट एंड परिसरातील सुमारे ७३ कोटी रूपये किंमत असलेल्या अर्पाटमेंटमध्ये तो राहत असल्याचे सांगण्यात येते. नुकताच त्याला माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपले होते.

Leave a Comment