व्हिडीओ – बीएसएफ जवानांसोबत अक्षय कुमारची होळी

akshay-kumar
बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमार लवकरच केसरी या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे. अक्षय सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण याच दरम्यान राजधानी दिल्लीत बीएसएफच्या जवानांची भेट घेतली. यावेळी अक्षय जवानांसोबत होळी खेळत आपल्या आगामी चित्रपटातील एका गाण्यावर थिरकला देखील.


राजधानी दिल्लीत अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा आपल्या आगामी केसरीच्या प्रमोशनसाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी बीएसएफच्या जवानांची भेट घेतली. यावेळी त्याने जवानांना रंग लावत केसरीच्या गाण्यावर मनसोक्त भांगडा देखील केला. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा ‘केसरी’ चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ईश्वर सिंह यांच्या भूमिकेत या चित्रपटात अक्षय असणार आहे. १८९७ च्या सारागढी युद्धावर चित्रपटाची कथा बेतली आहे. २१ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment