‘तारक मेहता..’ची सर्व टीम सिंगापूरमध्ये

Tmkoc
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ चे सर्व कलाकार सध्या सिंगापूरमध्ये असून कामानिमित्त हे सर्व जण येथे आले असले, तरी मालिकेच्या चित्रीकरणाच्या व्यतिरिक्त सर्व मंडळी पर्यटनाचा ही आनंद घेत आहेत. या मालिकेमध्ये ‘बबिता’ची भूमिका करणारी मुनमुन दत्ता आणि ‘टपू’ची भूमिका साकारणारा राज अनाडकत यांनी आपल्या टीमसोबतची भरपूर छायाचित्रे सोशल मिडीयावर शेअर केली आहेत. ‘तारक मेहता..’ही मालिका गेल्या एका दशकापासून टीव्हीवर प्रसारित केली जात असून आजही या मालिकेची लोकप्रियता पूर्वीइतकीच टिकून आहे.
Tmkoc1
या मालिकेमध्ये ‘दयाबेन’ ची सुपरहिट ठरलेली भूमिका करणाऱ्या दिशा वाकानीने जेव्हा काही कारणास्तव ही मालिका सोडली तेव्हा या मालिकेची लोकप्रियता काहीशी कमी झाली असली, तरी अजूनही या मालिकेच्या प्रत्येक भागाची दर्शक आवर्जून वाट पहात असतात. सध्या ‘तारक मेहता…’ची टीम समुद्रसफरीचा आनंद घेत असून, आपल्या चाहत्यांसाठी देखील भरपूर छायाचित्रे सोशल मिडीयावर प्रसिध्द करीत आहेतच, पण त्याशिवाय या प्रवासादरम्यानच्या त्यांच्या अनुभवांच्या बद्दलही हे कलाकार सोशल मिडीयावर पोस्ट करीत आहेत.
Tmkoc2
‘तारक मेहता..’ही सर्वाधिक काळासाठी सुरु असणारी मालिका असून, गेल्या एका दशकापासून सातत्याने आजतागायत सुरु असल्याचा विक्रम लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या मालिकेच्या नावे नोंदलेला आहे.

Leave a Comment