जॉन अब्राहमच्या ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर’चा ट्रेलर रिलीज

john-abraham
बॉलिवूडचा मॅचोमॅन अर्थात जॉन अब्राहमच्या आगामी ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. जॉन अब्राहम १९७१ च्या युद्धातील एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात जॉन १८-२० अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात मौनी रॉय आणि जॅकी श्रॉफ यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यांची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

एका ख-या भारतीय गुप्तहेराच्या आयुष्यावर आधारित जॉनचा हा चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. या गुप्तहेराने पाकिस्तानच्या सैन्यात सामील होऊन भारतीय सैन्यासाठी काम केले होते. ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ या चित्रपटाची पटकथा रॉबी गरेवाल यांनी लिहिली असून या चित्रपटाचे तेच दिग्दर्शक आहेत. येत्या ५ एप्रिलला ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर (रॉ)’ हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment