नवज्योतसिंह सिद्धुची कपिलच्या शोमध्ये वापसी?

kapil-sharma
माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी पुलवामात झालेल्या हल्ल्यानंतर पुलवामा हल्लानंतर पाकिस्तानशी चर्चा करुन तोडगा काढला पाहिजे असे वक्तव्य करुन वाद ओढावून घेतला होता. त्यानंतर सिद्धुवर सर्व स्तरातून टीका झाली. नेटकऱ्यांनी सिद्धू यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. नेटकऱ्यांनी त्याचबरोबर सिद्धुची कपिल शर्मा शोमधून हकालपट्टी कर अशी मागणी लावून धरली होती. त्यानुसार या शोमधून सिद्धू यांना बाहेरचा रस्ताही दाखविण्यात आला. त्यांच्या जागी अर्चना पूरण सिंह यांच्यावर परिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. पण सिद्धु आता या शोमध्ये पुन्हा वापसी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सिद्धू यांना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परत आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून हे प्रकरण शांत होण्याची शोचा निर्माता अभिनेता सलमान खान वाट पाहत आहे. सिद्धू यांची हा वाद निवळल्यानंतर पुन्हा एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये एण्ट्री होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment