एरियल स्ट्राईकसंदर्भात हवाई दल प्रमुखांचा खुलासा

BS-Dhanoa
कोईम्बतूर – भारतीय हवाई दलाने केलेल्या एरियल स्ट्राईकमध्ये जैश ए मोहम्मदचे किती दहशतवादी मारले गेले, याबाबत अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत असून हा राजकीय मुद्दाही बनत चालला होता. त्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी.एस. धनुआ यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रथमच एरियल स्ट्राईकसंदर्भात खुलासा केला आहे. पत्रकार परिषदे दरम्यान धनुआ यांनी आम्ही फक्त लक्ष्य ठेवतो आणि ते पूर्ण करतो, किती दहशतवादी मारले हे मोजणे आमचे काम नसल्याचे स्पष्ट केले आहे.

14 फेब्रुवारीला पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर एरियल सर्जिकल स्ट्राईक केला. जैश-ए-मोहम्मदचे कंबरडे या कारवाईने मोडले. एरियल स्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. पण आता आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावरुन देशात सुरू झाले होते. नेमके किती दहशतवादी मारले याचा आकडा सरकारने जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून होत होती. तर, या हल्ल्यात कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याचे पाकिस्ताकडूनही सांगण्यात आले होते. भारतीय हवाई दलाकडून त्या पार्श्वभूमीवर याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. आम्ही फक्त आमचे टार्गेट साधतो, आणि त्यावर मारा करतो. त्यामध्ये किती दहशतवादी मारले गेले किती, जिवीतहानी झाली, हे मोजणे आमचे काम नाही, ते सरकार पाहिल, असे वायू सेना प्रमुख बी.ए. धनुआ यांनी म्हटले आहे.

Leave a Comment