इम्रान खानच्या वक्तव्याचे गायक-अभिनेता अली जफरकडून समर्थन

ali-zafar
पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरने भारताला प्रत्युत्तर देण्यासंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. पाकिस्तानचा पुलवामा हल्ल्याशी काडीमात्रा संबंध नसल्याचे म्हणत भारतावरच आगपाखड केली होती. त्याचबरोबर आमच्यावर भारताने चाल केल्यास त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल असे म्हटले होते.

अलीने इम्रान खान यांच्या या वक्तव्याचे ‘व्हॉट अ स्पीच’ असे ट्विट करत कौतुक केले आहे. आतापर्यंत ‘लंडन पॅरिस न्यूयॉर्क’, ‘तेरे बिन लादेन’ आणि ‘मेरे ब्रदर की दुल्हन’सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये अलीने भूमिका साकारल्या आहेत आणि गाणीदेखील गायली आहेत. पण इम्रान खानचे समर्थन केल्यामुळे जफर अली सोशल मीडियावर ट्रोल झाला आहे.

त्याचबरोबर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने देखील इम्रान खान याच्या वक्तव्याचे समर्थन करत, तुम्ही दिलेले प्रतिउत्तर एकदम योग्यच असल्याचे म्हटले आहे.