असे आहे आयपीएलच्या पहिल्या 2 आठवड्यांचे वेळापत्रक

IPL
मुंबई – नुकतेच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामाचे वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले असून आयपीएलच्या १२ व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार असून धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिली लढत होणार आहे.

आगामी लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता बीसीसीआयकडून आयपीएल २०१९ च्या पहिल्या २ आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.


मागील काही दिवसांपासून निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आयपीएलचे काही सामने भारताबाहेर होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. पण बीसीसीआयने यापूर्वीच आयपीएल भारतात होणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यावेळी निवडणुका लक्षात घेता सामन्याची तारीख आणि ठिकाण घोषित करण्यात आले नव्हते.

Leave a Comment