भाई… उत्तरार्धातील ‘नाच रे मोरा’ गाणे रिलीज

bhai
लवकरच ‘भाई -व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज होणार असून पु.ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि अतिशय गाजलेल्या ‘नाच रे मोरा’ या गाण्याचा व्हिडिओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

‘कानडा राजा पंढरीचा’ हे गाणे ‘भाई’च्या पहिल्या भागात पाहायला मिळाले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला ‘कानडा राजा पंढरी’चा या गाण्याचे नवे रुप आले होते. पहिल्या भागातील जुगलबंदीला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता दुसरा भाग प्रदर्शित होताना नव्याने ‘नाच रे मोरा हे गाणे रसिकांना पाहता येणार आहे.

सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा उत्तरार्धात समावेश आहे. पहिल्या भागात आपल्याला पुलंचे लहानपण, आई-वडिलांचे संस्कार, भावंडांचे प्रेम, सुनीताबाईंचा त्यांच्या आयुष्यातील प्रवेश आणि कलाकार म्हणून पुलंचे घडत जाणे हे सगळे खूप सुंदर पद्धतीने पाहायला मिळाले. पुलंची आणखी एक बाजू आता दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. उत्तरार्धात पुलंचे साहित्य, नाटकातील योगदान ते उतारवयातील पु.ल. असा प्रवास पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment