
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हे दोघे पून्हा एकदा चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. या दोघांनी ‘तमाशा’ चित्रपटात दमदार भूमिका साकारल्यानंतर आता रोमांस ड्रामा असलेल्या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. रणबीर आणि दीपिकाचा हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजे 2020 साली प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती टी सीरीजचे भूषण कुमार करणार आहेत.
2020 मध्ये प्रदर्शित होणार रणबीर-दीपिकाचा चित्रपट
रणबीर आणि दीपिका यांच्यासोबत या चित्रपटात बॉलीवुडचा सिंघम अजय देवगन मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे मागील वर्षी बोलले जात होते. नुकताच समोर आलेल्या बातमीनुसार दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर दोघांनी चित्रपटासाठी होकार दिला आहे. चित्रपट डिसेंबर 2020 मध्ये चित्रपटागृहात दाखल होणार आहे.
चित्रपटाच्या टीमकडून सध्या तरी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करणयात आलेली नाही. 2008 साली ‘बचना ऐ हसीनों’ चित्रपटात रणबीर आणि दीपिकाने एकत्र काम केले होते. याच चित्रपटानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली. परंतू त्याचे नाते अपयशी ठरले. ब्रेकअप नंतर दोघांची जोडी ‘तमाशा’ चित्रपटातून चाहत्यांच्या समोर आली. पून्हा दोघांना एकत्र बघणे चाहत्यांसाठी औत्सुक्याचे असणार आहे.
