
बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘मणिकर्णिका-द क्विन ऑफ झांसी’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोनु सूदही या चित्रपटात सुरुवातीला भूमिका साकारणार होता. पण काही कारणास्तव त्याने या चित्रपटातून माघार घेतली होती. या चित्रपटासाठी त्याने शूटिंगही केली होती. सध्या सोशल मीडियावर याच चित्रीकरणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ व्हायरल; सोनु सूदचा ‘मणिकर्णिका’त होता ‘असा’ लूक
या चित्रपटाबाबत प्रदर्शनापूर्वी वर्षभर वादविवाद सुरू होते. हा चित्रपट अनेक अडचणींना सामोरे जात अखेर प्रदर्शित झाला. कंगना आणि अभिनेता सोनू सुद यांच्यातही चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वाद निर्माण झाला होता. सोनू सुदने त्यानंतर या चित्रपटातून माघार घेतली. या चित्रपटातील सोनू सुदच्या शूटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात त्याचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सोनू वीर सदाशिवची भूमिका साकारणार होता. नंतर ही भूमिका जीशान अयूबच्या वाट्याला आली.
