‘देसी गर्ल’च्या निकवर भूमी पेडणेकरचा डोळा

bhumi-pednekar
२०१८ हे वर्ष बॉलिवूडसाठी लग्नसराईचे वर्ष ठरले. ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या ग्रॅन्ड लग्नसोहळ्याने या वर्षाचा समारोप झाला. त्यांच्या लव्ह अफेअरच्या चर्चाही मोठ्या प्रमाणात झाल्या. बॉलिवूडला प्रियंका आणि निकच्या लग्नामुळे एक सुखद धक्का बसला होता. या दोघांची मोठ्या प्रमाणात लोकप्रियता पाहायला मिळते. पण देसी गर्लचा हा विदेशी निक आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचा क्रश आहे.

प्रियंकाच्या निकला डेट करण्याची इच्छा अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने बोलून दाखविली आहे. तिने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये निक तिचा क्रश असल्याचे सांगितले आहे. तिने करण जोहरच्या या शो मध्ये राजकुमार रावसोबत हजेरी लावली होती.

आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी भूमीने या शोमध्ये शेअर केल्या. मी लहानपणापासूनच निकची गाणी ऐकत आली आहे. मी जेव्हापासून त्याला बघितले मला तो तेव्हाच आवडला होता. तो तेव्हापासून माझा क्रश असल्याचे भूमीने यावेळी सांगितले.


काही मजेदार खुलासे राजकुमार रावनेही केले. ऐश्वर्या रायवर क्रश असल्याचे त्यानेही सांगितले. राजकुमारने तिच्यासोबत ‘फन्ने खान’ चित्रपटात काम केले आहे. तिच्यासोबत पुन्हा भूमिका साकारायला आवडेल, असेही त्याने सांगितले. अनेक कारणांमुळे करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो चर्चेत असतो. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची गुपीते यात प्रेक्षकांना पाहायला मिळतात. त्यामुळे या शोची लोकप्रियता आहे.

Leave a Comment