व्हीडीओ; शमीने फाडफाड इंग्लिश बोलून सर्वांनाच केले चकित

mohammad-shami
माऊंट मोनगानुई – भारताने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव केला. भारताने या विजयासह मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. गोलंदाजीतील हुकमी एक्का मोहम्मद शमीया सामन्याचा हिरो ठरला. सामनावीर किताबाने त्याला गौरविण्यात आले. त्याने यावेळी फाडफाड इंग्लिश बोलून सर्वांनाच आश्चर्यचा धक्का दिला.


या सामन्यात शमीने ९ षटकात ४१ धावा देत ३ गडी बाद केले. सामनावीर किताब घेण्यासाठी गेला तेव्हा त्याच्यासोबत विराट कोहलीदेखील होता. सायमन डूलने त्याला अवॉर्ड घेते वेळी गोलंदाजीविषयी प्रश्न विचारले. कोहलीने यावेळी स्वत: उत्तर द्यायला सांगितले. शमी बोलताना म्हणाला की, हवेच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी करणे खूपच कठिण असते. दुसऱ्या बाजूने भूवी चांगली गोलंदाजी करत होता. दोघेही चांगली लाइन-लेंथवर गोलंदाजी करत होते. ही सर्व उत्तरे मोहम्मद शमी इंग्लिशमध्ये देत होता. त्यानंतर समालोचक डुल मस्करीत शमीला म्हणाला की, युअर इंग्लिश बहुत अच्छा.

शमीला पहिल्या एकदिवसीय सामन्यात देखील सामनावीर किताब देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी अवॉर्ड घेतेवेळी कोहली हा शमीचा ट्रान्सलेटर बनून गेला होता. विराट शमीला समालोचकाचे इंग्लिश प्रश्न हिंदीत सांगत होता. शमीची हिंदी उत्तरे कोहली इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करत होता. तिसऱ्या सामन्यात सामनावीर किताब घेताना शमी स्वत: सर्व उत्तरे इंग्लिशमध्ये उत्तरे देत होता.

Leave a Comment