‘राजश्री प्रॉडक्शन्स’च्या ‘हम चार’चा ट्रेलर रिलीज

hum-chaar
एका अनोख्या संकल्पनेसह नवीन चित्रपट घेऊन ‘राजश्री प्रॉडक्शन्स’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘हम चार’ असे असून चार नवीन चेहऱ्यांना यामध्ये संधी देण्यात आली आहे. ‘हम चार’चा ट्रेलर ‘फ्रेंड्स भी फॅमिली है’ या टॅगलाइनसह रिलीज करण्यात आला आहे.

यात नमित, सुरजो, अबीर आणि मंजरी अशा चार मित्रांची कहाणी दाखवण्यात आली आहे. ‘मेरी दोस्ती मेरा प्यार’ हे ‘दोस्ती’ चित्रपटातील गाणे ट्रेलरच्या सुरुवातीलाच पाहायला मिळत आहे. त्यानंतर एकमेकांपासून दुरावलेल्या या चार मित्रांमध्ये अजूनही एकमेकांविषयी असलेली काळजी, प्रेम ट्रेलरमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.

या चित्रपटात प्रित कमानी, सिमरन शर्मा, अन्शुमन मल्होत्रा आणि तुषार पांडे हे चौघे मुख्य भूमिकेत आहेत. राजश्रीने सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाच्या तीन वर्षांनंतर ‘हम चार’ या चित्रपटाची घोषणा केली. अभिषेक दीक्षित या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तर सूरज बडजात्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत.