‘मणिकर्णिका’मधील आणखी एक गाणे रिलीज

manikarnika
अभिनेत्री कंगणा राणावत लढवैय्या आणि धाडसी अशा झाशीच्या राणीची कथा रुपेरी पडद्यावर घेऊन येत आहे. लवकरच ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाता ट्रेलर, टीझर प्रदर्शित झाल्यानंतर यामधील नवे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

देशाप्रतीचे प्रेम म्हणजे काय असते हे ‘मणिकर्णिका…’मधील ‘भारत ये रहना चाहिए’ या गाण्यातून स्पष्टपणे जाणवत आहे. प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी ‘देश से है प्यार तो, हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए.’ असे बोल असलेले हे गाणे शब्दबद्ध केले आहे. हे गाणे सैन्य दिनाचं औचित्य साधून भारतीय लष्कराला समर्पित प्रदर्शित करण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या बालपणापासून ते त्यांनी लढलेल्या लढाईपर्यंतचा जीवनप्रवास या गाण्यामध्ये थोडक्यात दाखविण्यात आला आहे.

दरम्यान, प्रसून जोशी यांनी या गाण्याच्या प्रदर्शनानंतर #देशप्रेमजताओ, #DeshPremJatao हा नवा हॅशटॅग सुरू केला आहे. प्रत्येकाने या हॅशटॅगच्या माध्यमातून आपले देशप्रेम व्यक्त करायचे आहे. देशप्रेम व्यक्त करण्यासाठी गाणे लिहून, गाऊन, फोटोच्या माध्यमातून किंवा एखाद्या व्याख्या या माध्यमाचा वापर करता येईल असे म्हटले आहे.

Leave a Comment