आनंद महिंद्रांना नव्या गाडीसाठी सुचवा नाव आणि दोन कार मिळवा बक्षीस

anand-mahindra
सोशल मीडियावर महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा कायमच सक्रिय असतात. ते आपले सामाजिक भान दाखवत कधी कोणाला मदतीचा हात देत तर कधी एखाद्याचे जाहीर कौतुक करताना दिसतात. त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टीही ते सोशल मीडियाद्वारे सगळ्यांसोबत शेअर करत असतात. त्यांना नुकतीच त्यांच्याच कंपनीने बनवलेली Alturas G4 ही गाडी मिळाली आहे. मी ग्रे घोस्ट असे नाव माझ्या या TUV 3OO plus गाडीला दिले आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी यामध्ये आपल्याला गाडीची किल्ली मिळतानाचा एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये मागे त्यांची नवीन काळ्या रंगाची कारही दिसत आहे.


त्यांनी आपल्या या सुंदर गाडीला चांगले नाव देण्यासाठी एक अनोखी पद्धत वापरली आहे. त्यांनी या गाडीला कल्पना लढवून नाव देण्याचे आवाहन केले आहे. एक नाव यामधून निवडले जाईल आणि त्या व्यक्तीला महिंद्रांकडून खास भेट देण्यात येणार आहे. या नव्या मॉडेलला ज्या व्यक्तीने दिलेले नाव देण्यात येईल त्या व्यक्तीला महिंद्रा कंपनीच्या २ कार भेट म्हणून देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटला अर्ध्या तासात असंख्य प्रतिक्रिया आल्या असून अनेकांनी आपल्या कल्पनाशक्तीला ताण देत नावे सुचवली आहेत.

Leave a Comment