
हार्दिक पांड्या व के.एल.राहूल कॉफी विथ करणमध्ये महिलांसंदर्भात हीन वक्तव्ये करण्याची फळे भोगत असताना विराट कोहलीचा आता एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मुलीचा उल्लेख त्याने कुरूप होती असा केला असून आता विराटवरही ट्रोल होण्याची वेळ आली आहे.
एका खूप जुन्या व्हिडीओवरून ट्रोल होत आहे विराट कोहली
Virat Kohli calls a girl "ugly" after leaving her stranded on a date.
Post your misogyny outrage below. pic.twitter.com/DjLYh4JJym
— c. Dennis b. Freedman (@DennisCricket_) January 13, 2019
महिलांबाबत पांड्या व राहूल यांनी केलेली हीन वक्तव्ये त्यांना एवढी महागात पडली की बीसीसीआयने त्यांच्यावर अनिश्चित काळासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. या विषयावर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली पांड्या व राहूलवर टीकेचा भडीमार झाला आणि आता विराटचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील एका पत्रकाराने ट्विट केला आहे. विराटला अनुष्का दांडेकर या निवेदिकेने सगळ्यात पटकन आटोपलेली डेट कुठली असा प्रश्न विचारला होता. त्याने सांगितले की, अपरिचित अशा मुलीसोबत मी डेट ठरवली होती, जी पाच मिनिटांतच संपली. त्या मुलीला बघताच मी पळून गेलो. यावर अनुष्काने तू का पळाला असा प्रश्न विचारला. विराटने त्यावर ती कुरूप होती असे उत्तर दिले.
