
आज देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. वेगवेगळ्या प्रांतात पोंगल, बिहू, लोहरी आणि मकर संक्रात या नावाने प्रसिद्ध असलेला हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. पतंग उडविण्याचीही यादिवशी प्रथा आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानेही याचनिमित्ताने त्याची मुलगी नितारा हिच्यासोबत पतंग उडवून या सणाचा आनंद लुटला.
व्हायरल; लाडक्या लेकीसोबत अक्षय कुमारने साजरी केली संक्रांत
नितारासोबतचा एक व्हिडिओ अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो यात नितारासोबत पतंग उडवताना दिसत आहे. निताराच्या हातात मांजा दिसत आहे. त्याने हा व्हिडिओ ‘छोटी मदतगार’ (लिटील हेल्पर) असे कॅप्शन देत शेअर केला आहे. त्याने या व्हिडिओसोबत चाहत्यांनाही संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
२०१८ हे वर्ष अक्षयसाठी खुप यशस्वी ठरले. बॉक्स ऑफिसवर त्याच्या ‘गोल्ड’ चित्रपटाने दमदार कमाई केल्यानंतर तो २.०मध्येही रजनीकांतसोबत झळकला. कमाईचे नवे विक्रम या चित्रपटानेही बनवले. अक्षयचे दोन चित्रपट आगामी काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो सध्या ‘केसरी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो यात परिणीती चोप्रासोबत दिसणार आहे.
