महानायकासोबत स्क्रिन शेअर करणार ‘आर्ची’ अन् ‘परशा’

combo
‘आर्ची’ आणि ‘परशा’ म्हणजेच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू ही जोडी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’मुळे खुप लोकप्रिय झाले. चाहत्यांना या चित्रपटानंतर या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची उत्सुकता होती. हे दोघेही आता नागराज मंजुळेंच्याच ‘झुंड’ चित्रपटात झळकणार आहेत. आता या दोघांच्याही बॉलिवूड पदार्पणाचीही चर्चा आहे.

‘झुंड’ चित्रपटाची मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यात महानायक अमिताभ बच्चन हे देखील भूमिका साकारणार आहे. त्यांनी चाहत्यांशी या चित्रपटाचे अनेक अपडेट्सही शेअर केले आहेत. आकाश आणि रिंकू देखील आता यात एकत्र झळकणार असल्याने या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या ‘सैराट’ला मिळालेल्या उत्तुंग यशानंतर दोघांनाही ‘आर्ची’ आणि ‘परशा’ याच नावाने ओळखले जाऊ लागले. दोघांनीही ‘झुंड’साठी नागपूर येथे शूट केल्याचे कळते. याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, आकाश ठोसर यात फुटबॉलपटूच्या भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Comment