मी रशियासाठी काम केले नाही – डोनाल्ड ट्रम्प

Donald-Trump
आपण रशियासाठी काम केले नसल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले आहे. तसेच हा प्रश्न विचारणे हे माझ्यासाठी अपमानास्पद असल्याचेही ते म्हणाले.

ट्रम्प यांनी रशियासाठी काम केले आहे का, याची चौकशी फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) करत आहे, असा गौप्यस्फोट न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्राने केला होता. या संदर्भात प्रश्न विचारला असता सोमवारी ट्रम्प यांनी हा निर्वाळा दिला.

“मी रशियासाठी कधीच काम केले नाही. अन्य कोणाहीपेक्षा हे तुम्हाला अधिक चांगले माहित आहे,” असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील दक्षिण लॉनवर सांगितले. रशियाबाबत एफबीआयच्या तपासाबद्दल ट्रम्प म्हणाले की, “हा एक मोठा बनाव आहे.”

एफबीआयचे अधिकारी पक्षपाती असल्याची टीका त्यांनी केली. “ते तपास करणारे लोक जगजाहीर बदमाश आहेत. ते गलिच्छ पोलीस आहेत असे आपण म्हणू शकता,” असे ते म्हणाले.

शनिवारी फॉक्स न्यूजच्या मुलाखतकर्त्याने या संदर्भात ट्रम्प यांना प्रश्न केला होता. तेव्हा त्याला नकार देताना ट्रम्प म्हणाले, की हा प्रश्न त्यांच्यासाठी अपमानास्पद आहे.

Leave a Comment