
पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस अभिनेता संदीप कुलकर्णी ‘डोंबिवली रिटर्न’ चित्रपटातून येत आहे. त्यांनी याआधी ‘डोबिंवली फास्ट’ चित्रपटातून सामान्य माणसाची व्यथा मांडली होती. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आले होते. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
सर्वसामान्य आयुष्य जगणा-या अनंत वेलणकरच्या आयुष्यात असे काय घडते की त्याचे आयुष्य बदलून जाते याचे चित्रण ‘जे जाते तेच परत येते?’ अशी लक्षवेधक टॅगलाईन असलेला ‘डोंबिवली रिटर्न’च्या टीजरमध्ये दिसत आहे. संदीप कुलकर्णी शिवाय अभिनेत्री राजेश्वरी सचदेव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘डोबिंवली रिटर्न’ हा चित्रपट सायकोथ्रीलरवर आधारित आहे.
संदीप कुलकर्णीच्या ‘डोबिंवली रिटर्न’चा टीझर रिलीज
‘डोंबिवली रिटर्न’ चित्रपटाची निर्मिती करंबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेअंतर्गत होणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन महेंद्र तेरेदेसाई करणार आहे. हा चित्रपट २२ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
