‘गली बॉय’मधील ‘अपना टाईम आयेगा’ गाणे रिलीज

ranveer-singh
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची जोडी असलेला ‘गली बॉय’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर काही दिवसांपुर्वीच रिलीज करण्यात आला होता. प्रेक्षकांनी या ट्रेलरला भरभरुन प्रतिसाद दिला. या चित्रपटातील आता पहिले रॅप गाणे ‘अपना टाईम आयेगा’ हे रिलीज करण्यात आले आहे. रणवीरचा हटके अंदाज या गाण्यात पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी रॅपरच्या भूमिकेत रणवीरच्या या गाण्याला काही तासातच भरभरुन लाईक आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांची परिस्थिती कशा प्रकारे असते, याची कथा ‘गली बॉय’च्या ट्रेलरमध्ये मांडण्यात आली. रणवीरचा संघर्ष यात दाखवला असून परिस्थितीमुळे सहन करावे लागणारे धक्के आणि यातून रॅप साँगपर्यंतचा त्याचा प्रवास या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. झोया अख्तरद्वारा दिग्दर्शित या चित्रपटाला शंकर-एहसान-लॉय यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटातून रणवीर आणि आलिया पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याने निश्चितच त्यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट अधिक खास असणार आहे. येत्या १४ फेब्रुवारीला ‘गली बॉय’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Comment