हार्दिक-राहुल वादात केदार जाधवची उडी!

kedar-jadhav
मुंबई – हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांना बीसीसीआयने कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे निलंबित केले आहे. ऑस्ट्रेलिया दौरा सोडून दोघांना बीसीसीआयच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी मायदेशी परतावे लागले आहे. हार्दिक-राहुलला करणची एक कॉफी पोळल्याची चर्चा सोशल मीडिया आणि क्रिकेटविश्वात जोरदार चालू आहे.


केदार जाधवने आता यात उडी घेताना त्यांच्या जखमेवर चहा ओतला आहे. शिखर धवन आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यासोबत चहा पितानाचा फोटो केदार जाधवने ट्वीट केला आहे. त्याने या फोटोखाली एक चहा सर्वकाही चांगले करतो, असे लिहिले आहे. तिघेही फोटोत मजेत चहा पिताना दिसत आहेत. नेटक-यांनी या फोटोचा सबंध थेट हार्दिक-राहुलच्या कार्यक्रमाशी जोडला आहे. या माध्यमातून केदारने हार्दिक-राहुलवर निशाणा साधल्याची चर्चा होत आहे. ट्वीटर या फोटोबाबत भन्नाट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी एक चहा सर्व काही ठिक करतो तर एक कॉफी सर्व काही बिघडवते, अशी प्रतिक्रिया दिली. तर, काहींनी चांगली मुले कॉफी पित नाहीत, असे लिहीले.

Leave a Comment