सुशांत सिंहच्या ‘सोन चिडिया’चा ट्रेलर रिलीज

sushant-singh-rajput
आगामी ‘सोन चिडिया’ चित्रपटामध्ये बॉलिवूडचा हँडसम हंक सुशांत सिंह राजपूत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा थरारक ट्रे्लर पाहून तुमच्या अंगावर नक्कीच काटा उभा राहील, यात शंका नाही. यात सुशांत सिंग राजपूत एका दरोडेखोराच्या भूमिकेत दिसत आहे.

या चित्रपटात १९७५साली लागू झालेल्या आणीबाणीनंतरची राजस्थानमधील चंबल येथील परिस्थिती दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये दरोडेखोर आणि पोलीस यांच्यातील वाद दाखवण्यात आला आहे. यासोबतच ट्रेलरमध्ये भूमी पेडणेकरची झलकही पाहायला मिळत आहे. थरारक आणि तितकाच कॉमेडी असा हा ट्रेलर प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मध्य प्रदेशच्या चंबल या गावात ‘सोन चिडिया’ या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. हा ट्रेलर पाहताना यातील प्रत्येक दृश्य हे वास्तवादी असल्याचेच वाटते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे. याआधी इश्किया, डेड इश्किया आणि उडता पंजाबसारखे चित्रपट अभिषेक चौबे यांनी दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटातून भूमी आणि सुशांत आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने निश्चितच त्यांचे चाहतेही या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.