प्रेक्षकांच्या भेटीस आले ‘गली बॉय’चे नवे पोस्टर

gully-boy
मागील गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘गली बॉय’ या चित्रपटातील कलाकारांचे खास लूक प्रदर्शित होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच रणवीर आणि आलियाचा आणखी एक खास लूक आता प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.


रणवीर आणि आलियाचा हा खास लूक चाहत्यांची मने नक्कीच जिंकेल. चित्रपटाचा टीझरदेखील काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटातही रणवीर इतर चित्रपटांप्रमाणेच नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचे या टीझरवरुन आणि यातील रणवीरच्या खास लूकवरुन समजत आहे.

शंकर-एहसान-लॉय यांनी झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटाला संगीत दिले आहे. मुंबईतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांची परिस्थिती कशा प्रकारे असते, याची कथा रणवीरच्या ‘गली बॉय’मध्ये मांडली आहे. यात त्यांचा संघर्ष दाखवला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. १४ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment