आपण काही खाल्लेतरी आपल्या दातांमध्ये अन्नाचे अत्यंत छोटे कण अडकतात आणि ते अन्नाचे कण काढण्यासाठी आपण सर्वसाधारणपणे टूथपिकचा करतो. पण दातातले अन्न काढायला जिवंत पक्ष्याच्या चोचीचा वापर केलेला तुम्ही कधी पाहिला आहे का? पण होय हे खरे आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका व्यक्तीच्या हातात त्यात चिमणी आहे. दातात अडकलेले अन्न काढण्यासाठी तो चक्क पक्ष्याच्या चोचीचा वापर करत आहे. ही व्यक्ती जेव्हा आपले तोंड उघडते तेव्हा पक्षी त्याच्या तोंडातील अन्न काढते. या व्यक्तीचे दात साफ करणारा पक्षी आपल्या चोचीने हे काम कसे करतो हे पाहण्यासाठी या व्हिडियोवर नेटकरी तुटून पडले आहेत.
U would have seen lots of toothpicks… But a *Sheiks toothpick*… bet u never seen one like this before! 🙌😀😎 #ArabsGotTalent @Atheist_Krishna @FrustIndian @IAmSteveHarvey @JimCarrey @rishibagree @elonmusk @virendersehwag @Being_Humor pic.twitter.com/dmQQ6LEUQv
— Jag (@imrealjag) September 16, 2018
फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅपवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून लाइकही केले आहे. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे आणि तो व्यक्ती कोण आहे याबद्दल कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आली नाही.