रिलायन्सने जिओ फोन आणि जिओ फोन २ च्या ग्राहकांना दिले एक सरप्राईझ

jio
मुंबई : रिलायन्स जिओने जिओ फोन आणि जिओ फोन २ च्या ग्राहकांना आणखी एक सरप्राईझ दिले आहे. जिओफोन युझर्सना कंपनीने व्हॉटसअॅपनंतर आता युट्युब अॅप देखील उपलब्ध करून दिले आहे. जिओ फोन वापरणारे आता यूट्यूब व्हिडीओ देखील पाहू शकणार आहेत. रिलायन्स जिओने, याआधी जिओ फोन, जिओ फोन २ ग्राहकांसाठी १० सप्टेंबरपर्यंत व्हॉटसअॅप दिले आहे. तसेच सर्व फोनमध्ये देखील २० सप्टेंबरपर्यंत हे उपलब्ध होईल.

१९ सप्टेंबरपासून जिओ फोन वापरणारे ग्राहक यूट्यूब व्हिडीओचा आनंद घेऊ शकतील. या जिओ फोनच्या अॅपस्टोअरवर तो डाऊनलोड करता येणार आहे. तुमच्याकडे सुरूवातीचा जिओ फोन किंवा नंतरचा जिओ फोन २ असेल तरी देखील तुम्ही यूट्यूब अॅप त्यात डाऊनलोड करू शकता. रिलायन्सने काही महिन्याआधी रिलायन्स जिओने अपग्रेटेड वेरियंट जिओफोन २ लॉन्च केला होता. जिओ फोनमध्ये व्हॉटसअॅप डाऊनलोड करण्यासाठी , सर्वात आधी फोनच्या मेन्यू ऑप्शनमध्ये जा, यानंतर App Store सर्च करा. अॅपस्टोअरवर क्लिक करा, तेथे यूट्यूब सर्च करा. यानंतर त्याला डाऊनलोड करा. एकावेळा डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही मनासारखे व्हिडीओ पाहू शकता.

Leave a Comment