
नवी दिल्ली – कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वात मोठ्या आयसीआयसीआय बँकेत टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल करण्यात आले असून संदीप बक्शी यांना आयसीआयसीआय बँकेने संचालकपदी नियुक्त केले आहे. तर सक्तीच्या रजेवर चंदा कोचर यांना पाठवण्यात आले आहे.
चंदा कोचर यांना दणका; संदीप बक्षी आयसीआयसीआयचे संचालक
व्हिडिओकॉन ग्रुपला कर्ज देताना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर असल्यामुळे त्यांना या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
