मॉर्फीअर- वेड लावणारा कॅसिनो


कॅसिनो मध्ये जाऊन जुगारात हरले तर वेड लागण्याची वेळ अनेकांवर येते हे आपण ऐकून असतो. पण नुसत्या दर्शनाने वेड लावणारा एक कॅसिनो मॉर्फीअर नावाने मकाऊ येथे सुरु झाला असून तो सर्वांसाठी खुला आहे. या कॅसिनोची डिझाईन वेड लावणारे असून कितीही वेळा त्याच्याकडे पाहिले तरी समाधान होत नाही. यामुळे हा कॅसिनो जगभर प्रसिद्धीस आला आहे. या कॅसिनोच्या उभारणीसाठी १.१ अब्ज डॉलर्स खर्च केले गेले आहेत.

हा कॅसिनो ४२ मजली आहे. कॅसिनो मालकाची अशी अटच होती कि कॅसिनोची डिझाईन कुणालाही वेड लावणारे हवे. या कॅसिनोची भव्यता पाहूनच वेडे व्हायला होते असे म्हणतात. त्याचे मॉर्फिअर नाव स्वप्नांची देवता मोर्फिअरवरून ठेवले गेले आहे.


या कॅसिनोची डिझाईन करणारी इराकी ब्रिटीश डिझायनर जगप्रसिद्ध जहा हदीद या वस्तूरचनाकार महिलेने केले आहे. याचे काम २०१३ मध्ये सुरु झाले आणि हदीद २०१६ साली मृत्यू पावली. हदीद हि अशी पहिली महिला वास्तू रचनाकार आहे जिला आर्कीटेक्चरमधील पुलित्झर पारितोषिकाने गौरविले गेले आहे. चीनचे ओपेरा हाउस आणि बीजिंगचा मेगा मॉल तिनेच डिझाईन केला होता.

Leave a Comment