फ्लिपकार्टच्या सुपर व्हॅल्यू वीकमध्ये ७० हजार रुपयांचा स्मार्टफोन १०,९९९ रुपयांना !


मुंबई : ई-कॉमर्स वेबसाइट असलेल्या फ्लिपकार्टच्या सुपर व्हॅल्यू वीकला सुरुवात झाली असून वस्तूंवर अनेक ऑफर फ्लिपकार्टच्या सुपर व्हॅल्यू वीकमध्ये देण्यात आल्या आहेत. अनेक ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. १८ ते २४ जूनपर्यंत सुपर व्हॅल्यू वीक सुरु असणार आहे.

खासकरुन गुगल पिक्सल 2(१२८ जीबी) स्मार्टफोनवर सुपर व्हॅल्यू वीकमध्ये मोठी ऑफर आहे. 70 हजार रुपये इतकी गुगल पिक्सल 2 या स्मार्टफोनची किमत आहे. पण हा स्मार्टफोन या ऑफरमध्ये १०९९९ रुपयांना मिळू शकतो. याशिवाय फक्त गुगल पिक्सलच्या स्मार्टफोनवरच नाही, तर आणखी काही स्मार्टफोन अशा सवलती ग्राहकांना मिळणार आहेत. Moto X4 (४ जीबी) हा स्मार्टफोन २२९९९ रुपयांना आहे. मात्र, फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन ६९९९ रुपयांना मिळणार आहे. यासाठी कंपनीने काही अटी सुद्धा ठेवल्या आहेत.

बाजारात गुगल पिक्सल 2 (१२८ जीबी) या स्मार्टफोनची किंमत ७० हजार आहे. पण १०,९९९ रुपयांना फ्लिपकार्टवर खरेदी करु शकता. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट बायबॅक व्हॅल्यू ऑफरवर देणार आहे. बायबॅक म्हणजे ज्यावेळी तुम्ही हा स्मार्टफोन एक्सचेंज करणार त्यावेळी एक ठराविक किंमत ठरवलेली असते. ग्राहकाने या ऑफरमध्ये जर ८ महिन्यात हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर एक्सचेंज केला, तर ग्राहकाला बायबॅक व्हॅल्यू ऑफरमध्ये ४२,००० रुपयांना परत घेतला जाणार आहे. याशिवाय, एचडीएफसी बॅंकेच्या कार्डवर कॅशबॅक देण्यात आली आहे. ८००० रुपयांची ही कॅशबॅक आहे. पण यासाठीही काही अटी घालण्यात आल्या आहेत.

Leave a Comment