दिवसाला ३० सिगारेट ओढल्याने ती झाली दीर्घायुषी

batuli
नवी दिल्ली- आयुष्य कमी होण्याचा सिगारेटचे व्यसन हा मार्ग असे समजले जाते. पण एका ११२ वर्षीय महिलेने हीच सिगरेट दीर्घायुषी होण्याचा हा अजब दावा केला आहे. ती दिवसाला ३० सिगारेट ओढल्याने दीर्घायुषी झाली आहे. ती गेल्या ९५ वर्षांपासून सिगारेट ओढत असल्याचेही तिने सांगितले आहे.

या महिलेचे नाव बातुली लामिछाने असे असून तिचा जन्म मार्च १९०३ रोजी झाला आहे. ती १७ वर्षांची असतानापासून सिगारेट ओढत आहे. तिने दीर्घायुषी होण्याचे कारण तीचे सिगारेटचे व्यसन असल्याचा अजब दावा केला आहे. मी किती वृद्ध आहे आणि माझे वय किती आहे याचे मला घेणे देणे नाही. पण मी माझ्या आयुष्यात बरेच काही पाहिले आहे, असे बातुली यांनी सांगितले.