प्रथम स्थान राखण्यात टोयोटाला यश

toyota
टोकियो – जगातील सर्वात मोठय़ा वाहन उत्पादक कंपनीचा पुरस्कार टोयोटाने आपल्याकडे कायम ठेवला असून त्यांनी घोटाळ्य़ामुळे चर्चेत आलेली फोक्सवॅगन आणि अमेरिकन प्रतिस्पर्धी जनरल मोटर्स यांना मागे टाकून २०१५मध्ये १.०१ कोटी वाहनांची विक्री केली आहे.

प्रदूषण मानकांमध्ये फेरफार केल्याने चर्चेत आलेल्या फोक्सवॅगनने मागील वर्षात जगभरात ९९.३ लाख वाहनांची विक्री केली आहे. तर शेवरलेट आणि कॅडिलॉक निर्माता जीएमने ९८ लाख वाहनांची विक्री केली आहे. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यामध्ये जर्मनीची प्रमुख कंपनी टोयोटाच्या पुढे होती. मात्र प्रदूषण मानकामध्ये फसवणूक केल्याचा घोटाळा समोर आल्यानंतर फोक्सवॅगनची विक्री दहा वर्षात प्रथमच कमी झाली. त्यांना २० अब्ज डॉलरचा दंड लावण्यात येणार असल्याचे अमेरिकन सरकारने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment