
मुंबई : यामाहा इंडियाचा ब्रॅण्ड अम्बेसेडर जॉन अब्राहमने यामाहा कपंनीची नवी स्पोर्ट्स बाईक YZF-R3 लॉन्च केली असून या बाईकचे इंजिन ३२१ चक असून तिची किंमत सुमारे ३.२५ लाख रुपये असेल.
वेगाच्या चाहत्यांसाठी यामाहाने आणली YZF-R3 स्पोर्ट्स बाईक
११ ऑगस्टपासून निवडक १०० शोरुमध्ये या बाईकच्या विक्रीला सुरुवात होईल असे यामाहा इंडियाच्या वतीने सांगण्यात आले आहे. ६ स्पीड ट्रान्समिशनसह दोन सिलेंडरचे पॉवरफूल इंजिन या स्पोर्ट्स बाईकमध्ये लावण्यात आले असून ब्लू व्हाईट आणि रेड ब्लॅक या रंगात YZF-R3 बाईक उपलब्ध आहे. बाईकमध्ये १६०एमएमचा ग्राऊंड क्लिअरंस असेल.
आम्ही आमचे संपूर्ण इंजिनीअरिंग स्किल आणि पॅशन लावून आर सीरिजची बाईक बनवली असल्याचे यामाहा इंडिया मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक मॅसेकी आसानो यांनी सांगितले.

